श्री गुरु हरि कृष्ण साहिब जी- १६६१ ते १६६४ पर्यंत गुरु

गुरु हर कृष्ण साहिब जी
श्री गुरु हरि कृष्ण साहिब जी

त्यांचा जन्म १६५६ भारतातील कर्तारपूर येथे झाला. श्री गुरु हरि कृष्ण गुरु हे वयाने सर्वात तरुण गुरु होते. पाच वर्षांच्या वयात गुरु म्हणून पदवी मिळाली, गुरुजींनी ब्राह्मण पंडितांना त्यांच्या ज्ञान आणि अध्यात्मिक शक्तींनी आश्चर्यचकित केले.

सिखांकडे त्यांनी सेवा, शुद्धता आणि सत्य यांचे प्रतीक असल्याचे सिद्ध केले. तरुण गुरूंनी जाती आणि पंथ वगैरे न मानता सर्वांची सेवा केली. दिल्लीतिल महामारीत लोकांची सेवा व उपचार करताना गुरुजींनी आपले जीवन त्याग केले. विशेषतः, स्थानिक मुस्लिम लोक गुरु साहिबच्या शुद्ध मानवतावादी सेवेने खूप प्रभावित झाले आणि त्यांना बाला पीर असे नाव सुद्धा दिले.

जे कोणी पवित्र मानाने श्री गुरु हरि कृष्ण साहिब जी ना आमंत्रण दिले, त्यांच्या जीवनात कधीही अडी-अडचणी येणार नाहीत.

वडिलांचे नाव: गुरुहरि राय जी, आईचे नाव: माता किसन कौर जी असे होते.