श्री गुरु अर्जुन देव जी- १५८१ ते १६०६ पर्यंत गुरु

गुरु अर्जुन देव जी
श्री गुरु अर्जुन देव जी

त्यांचा जन्म भारतातील गोलवाड येथे १५६३ मध्ये झाला. ते श्री गुरु राम दास जी यांचे तिसरे पुत्र होते. गुरु अर्जुन उच्च गुणवत्तेचे आणि प्रतिष्टीत संत आणि विद्वान होते.

त्यांनी आदि ग्रंथ, शिखांचे ग्रंथ संकलित केले आणि सुखमनी साहिब लिहिले. श्री गुरु रामदासांनी सुरु केलेल्या श्री दरबार साहेब चे काम, श्री गुरु अर्जुन देव यांनी पूर्ण केले.

श्री दरबार साहिब सर्व धर्माचे स्वागत करते, ज्याचे चार दिशेने खुले चार दरवाजे आहेत.

जेव्हा सम्राट जहांगीर याने त्यांच्यावर पाच दिवस पाच रात्र अत्याचार केले, गुरुंच्या मते हे अत्याचार करुन परमेश्वर त्यांची परीक्षा घेत आहे व मी परमेश्वराशी किती निष्ठ आहे हे जाणून घेत आहे. त्यांनी ते अत्याचार हसत हसत झेलले. नंतर गुरुजी स्नानासाठी नदी मध्ये गेले, परत पुन्हा मानवी रुपात कधीच परतले नाहीत.

वडिलांचे नाव: गुरु राम दास, आईचे नाव: माता भानीजी, पत्नीचे नाव: माता राम देवी