श्री गुरु नानक देव जी- १४६९ ते १५३९ पर्यंत गुरू

गुरु नानक देव जी
श्री गुरु नानक देव जी

प्रथम गुरु आणि सिख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १४६९ रोजी तलवंडी (आता पाकिस्तानमध्ये नानाकाना साहिब म्हणून ओळखला जातो) येथे झाला. शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. गुरुजींनी लहान वयातच पंजाबी, संस्कृत आणि फारसीचे ज्ञान अंगीकृत केले आणि बालपणात अनुष्ठान, जाति, पूर्वाग्रह, पाखंड आणि मूर्तिपूजेला विरोध केला .

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. गुरु नानकांनी जेव्हा धार्मिक अंधविश्वासाचा बोलबाला सर्वत्र पाहिला आणि स्त्री जातीला अपमानित होताना, जसे पुरुषांना जानेवू घालण्याचा अधिकार आहे तसा स्त्रियांना नाही, अनेक मंदिरात स्त्रियांनां प्रवेशाला मनाई होती, ज्यामुळे ती पूजा अर्चना करू शकत नव्हती. स्त्रियांन बरोबर भेदभाव केला जात होता. तेव्हा त्यांनी आपल्या वाणीतुन, "जी स्त्री राजे, महाराजे, संत आणि महापुरुषांना जन्मदेते ती स्त्री अछूत कशी होऊ शकते, तिला वाईट कसे म्हणता येईल". त्याच बरोबर त्यांनी समाजात असलेले वेगवेगळे वर्ण ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र त्यावर गुरुजी म्हणतात,"सर्वाना परमेश्वरानं जन्म दिलेला आहे, जर त्याने भेदभाव ब्राम्हण किँवा शूद्र केला नाही तर मनुष्य कोण हे करणारा". तेव्हा त्यांनी नानक निर्मल पंथ चालविला. त्याच बरोबर त्यांनी शीख धर्माची स्थापना केली.

वइ नदीमध्ये ३ दिवस नानकांनी जी जलसमाधी घेतली त्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी 'कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत', असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.

त्यांनी हिंदू आणि मुसलमानांना समान मानले आणि स्वत:ला हिंदू किंवा मुस्लिम म्हणून नव्हे तर देवावर आणि सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा भाऊ म्हणून संदर्भित केले.

त्यांनी भारताच्या सर्व भागांमध्ये प्रवास केला आणि अरब देश पारशी देशांना भेटी दिल्या, मक्का आणि बगदादला भेट दिली. त्यांनी हिंदू, जैन, बौद्ध, पारसी आणि मुसलमानां च्या धर्माचा अभ्यास केला. त्यांनी मंदिरे आणि मशिदी आणि विविध तीर्थस्थळांवर आपले प्रवचन दिले. जिथे-जिथे ते गेले तिथे, गुरू नानकानी, धार्मिक रीति-रिवाज, तीर्थयात्रा, जातिव्यवस्था, विधवांची बलिदान, धर्माबद्दल पुस्तके आणि त्याच्या शिकवणींची पद्धती, हे त्यांचे प्रवचनाचे विषय होते. त्यांनी मुसलमानांना खरे मुस्लिम आणि हिंदूना खरे हिंदू राहण्याचा सल्ला दिला.

सवंत १५९६ मध्ये गुरु नानक देवजींनी या इहलोकाचा निरोप घेतला व ते ब्र ब्रम्हतत्वात विलीन झाले.

वडिलांचे नाव: कल्यान दास, आईचे नाव: माता त्रिपताजी, पत्नीचे नाव: माता सुलाखनजी

गुरु नानक देवजींचे समाधी स्थान. कर्तारपूर, पाकिस्तान मध्ये आहे.

.