• Slider Banner

    श्री गुरु ग्रंथ साहिबजी

    Read more
  • Slider Banner

    वाहे गुरुजीका खालसा । वाहे गुरुजीकी फतेह ।।

    Read more
  • Slider Banner

    अकाल तख्त साहिबजी (द गोल्डन टेम्पल)

    अमृतसर, पंजाब

    Read more
  • Slider Banner

    तख्त श्री केसगढ साहिबजी

    आनंदपूर साहिब, पंजाब

    Read more
  • Slider Banner

    तख्त श्री दमदमा साहिबजी

    बठिंडा, पंजाब

    Read more
  • Slider Banner

    तख्त श्री हरमिंदर पटना साहिबजी

    पटना, बिहार

    Read more
  • Slider Banner

    तख्त श्री हजूर साहिबजी

    नांदेड, महाराष्ट्र

    Read more

श्री गुरु ग्रंथ साहिबजी

मराठी माणसाला शिख माणूस माहित आहे. त्यांची उद्दमशीलता, त्यांनी गाजवलेले शोर्य माहीत आहे. आजही भारतीय सैन्य दलात शिख बांधव बजावत असलेली महत्वाची कामगिरी माहित आहे. देश, धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणा करता सिख गुरूंनी, त्यांच्या पुत्रांनी केलेले अत्युच्य बलिदानाबद्दल त्यांच्यापुढे आदराने माथा विनम्र होतो. पण हे सर्व करणाऱ्या शिख बांधवांचा मनोपिंड ज्यावर पोसला जातो त्या त्यांच्या धर्मग्रंधाबद्दल 'श्री गुरु ग्रंथ साहिबजी' बद्दल मात्र मराठी माणसाला फारच कमी माहिती आहे.

श्री गुरु ग्रंथ साहिबजी- ग्रंथ परिचय >>>

एका दृष्टीक्षेपात सिख धर्म

सिखचा अर्थ "सत्याचा शोधक" असा आहे. सिख धर्म त्यांच्यासाठी एक आध्यात्मिक मार्ग आहे जे त्यांच्या दैवी सत्याने कायमस्वरुपी संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. सर्व आध्यात्मिक परंपरेप्रमाणेच, सिख धर्मांचे मूळ व वारसा, मार्गदर्शक तत्त्वे, तत्त्वज्ञान, त्यांचे गुरु, संत आणि इतिहास आहेत. शीख म्हणजे एक देव संकल्पनेवर विश्वास ठेवणारा, सकाळी लवकर उठून देवाची प्रार्थना करणारा, आपल्या कमाईचा १० वा भाग दान करणारा, आपल्या १० गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा व श्री गुरु ग्रंथ साहेबाचा पठण करणारा.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा >>>

गुरुद्वारा

"गुरुद्वारा" म्हणजे गुरुचे दरवाजे ! हे शिखांचे सभास्थान आणि उपासनेचे ठिकाण आहे. सर्व धर्मांतील लोक आणि जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, त्यांचे सिख गुरुद्वारामध्ये स्वागत आहे. प्रत्येक गुरुद्वारामध्ये दरबार साहिब आहे, जेथे सिखांचे वर्तमान आणि सार्वकालिक गुरु, "श्री गुरु ग्रंथ साहिबजी" हा ग्रंथ एका प्रमुख तख्तावर ठेवलेला असतो. समूहाच्या उपस्थितीत, गुरु ग्रंथ साहिबजीच्या श्लोकांचे गायन व वर्णन करतात. सर्व गुरुद्वारामध्ये एक लंगर हॉल असतो, येथे लोकांना मोफत शाकाहारी भोजन दिले जाते.

 

गुरुद्वाराबद्दल अधिक माहिती साठी येथे क्लीक करा >>>

SITE IS MADE PURLY FOR THE PURPOSE OF THE SPREADING INFORMATION AND KNOWLEDGE ABOUT SIKH RELEGION. THERE IS NO INTENTION TO EARN MONEY FROM ANY SOURCE.

फक्त माहितीच्या वितरण उद्देशासाठी आणि सिख धर्म बद्दल माहिती मिळण्यासाठी ही वेब साइट बनविण्यात आली आहे. कोणत्याही स्रोताकडून पैसे कमविण्याचा कोणताही हेतू या कार्यामागे नाही.